Republic Day 2024 LIVE: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथवर भव्य परेड सुरु, प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची उपस्थिती

आज भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य परेड सुरु झाली आहे.भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांच्यासह प्रमुख पाहुणे फ्रान्सचे अध्यक्ष श्री इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत कर्तव्य पथावर परेड सुरु झाली.

Republic Day 2024 LIVE: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथवर भव्य परेड सुरु,  प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची उपस्थिती
Republic Day 2024 LIVE PC PTI

Republic Day 2024 LIVE: आज भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य परेड सुरु झाली आहे.भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांच्यासह प्रमुख पाहुणे फ्रान्सचे अध्यक्ष श्री इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत कर्तव्य पथावर परेड सुरु झाली. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांनी तिरंगा फडकवला.  यानंतर देशाचे राष्ट्रगीत गायले गेले आणि पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रगीताने भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगती, वाढत्या स्वदेशी क्षमता आणि देशातील महिला शक्तीचे प्रदर्शन दर्शविण्यास सुरुवात केली. भव्य परेडमध्ये देशाच्या लष्करी आणि सांस्कृतिक कामगिरीचे दर्शवण्यात आली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 26, 2024 11:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).