Michel Barnier Appointed As New French PM: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी मिशेल बार्नियर यांची फ्रांसचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. सरकारी निवेदनात म्हटले आहे की, बार्नियर यांना देश आणि फ्रान्सची सेवा करण्यासाठी एकत्रित सरकार स्थापन करण्याचे काम देण्यात आले आहे. 70 वर्षीय बार्नियर हे माजी ब्रेक्झिट निगोशिएटर आहेत. त्यांनी 2016 ते 2021 पर्यंत यूरोपीय संघ आणि ब्रिटन यांच्यात ब्रेक्झिटची वाटाघाटी केली होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. बार्नियर यांनी यापूर्वी देशाच्या सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ते यापूर्वी युरोपियन युनियनचे आयुक्तही राहिले आहेत.

बार्नियर यांचा जन्म  9 जून 1951 रोजी झाला. ते फ्रान्सचा पुराणमतवादी पक्ष लेस रिपब्लिकन (LR)चे नेते आहेत. वयाच्या 27 व्या वर्षी सोवई जिल्ह्यातून विजयी होऊन ते पहिल्यांदाच संसदेत निवडून आले. (हेही वाचा: Donald Trump Danced at Public Event: डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केला डान्स; यूजर्संनी दिल्या मजेशीर कमेंट्स, पहा व्हिडिओ)

मिशेल बार्नियर यांचा फ्रेंच सरकारमधील कार्यकाळ-

1993-1995: पर्यावरण मंत्री

1995-1997: युरोपीय व्यवहार मंत्री

2004-2005: फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री

2009-2010: फ्रान्सचे कृषी मंत्री

मिशेल बार्नियर यांची फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)