भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) नेते पी.व्ही.सत्यनाथन यांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आली आहे. ते 62 वर्षांचे होते. ही घटना पेरीवत्तूर चेरियापुरम मंदिरात उत्सवादरम्यान 22 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 10 वाजणेच्या सुमारास घडली. सत्यनाथन हे भाकप (मार्क्सवादी) पक्षाचे कोयलांडी शहर मध्यवर्ती स्थानिक समिती सचिव होते. हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. सत्यनाथन यांच्या मानेवर एकाच जागी चार वार झाले. ज्यामध्ये एक वर्मी लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला. त्यांना तात्काळ कोयलंडी येथील तालुका रुग्णालयात नेण्यात आले. परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत म्हणून घोषीत केले.
पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. हल्लेखोर पसार असून या प्रकरणा अद्याप कोणालाही अटक झाली नाही. उत्सवाचा एक भाग म्हणून संगीताचा कार्यक्रम सुरू असताना रात्री 10 च्या सुमारास सत्यनाथन यांच्यावर हल्ला करण्यात आला. पाठीवर आणि मानेवर हल्ला झालेल्या सत्यनाथन यांचा कोयलांडी येथील तालुका रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार आहे. शुक्रवारी कोयलंडीत बेमुदत बंदची घोषणा करण्यात आली आहे.
एक्स पोस्ट
Kerala | A CPI(M) local leader, PV Sathyanathan hacked to death by an axe, during a temple festival at Cheriyapuram Temple at Koyilandi in Kozhikode last night. A bandh has been declared in Koyilandi today in protest: CPI(M) district secretary P. Mohanan
(File pic: PV… pic.twitter.com/c8F1eZB2ay
— ANI (@ANI) February 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)