क्रिप्टो अॅसेट प्लॅटफॉर्म CoinSwitch ने घटते ग्राहक आणि व्यावसायिक पुनर्रचनेचे कारण देत टाळेबंदीचे धोरण अवलंबिले आहे. त्याच धोरणाचा भाग म्हणून कंपनीने 44 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. बेंगळुरूस्थित फर्ममधील ही पहिलीच टाळेबंदी आहे. CoinSwitch प्रवक्त्यांनी माहिती देताना सांगितले की,आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नावीन्य, मूल्य आणि सेवेला प्राधान्य देऊन स्पर्धात्मक राहण्यासाठी आमच्या व्यवसायाचे सतत मूल्यांकन करतो. त्यासाठी, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांच्या प्रश्नांच्या सध्याच्या सेवेचा आढावा घेतला. त्यानंतर 44 कर्मचाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला व्यवस्थापकांशी तपशीलवार चर्चेनंतर स्वेच्छेने राजीनामा दिला.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)