अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट जातप्रमाणपत्रे दाखवून नोकऱ्या मिळवल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत पुरुषांनी नग्न आंदोलन कले. ही घटना छत्तीसगड राज्यात घडली. ज्या दिवशी छत्तीसगड विधानसभेचे अधिवेशन सुरू होते, त्या दिवशी राज्यातील सरकारी नोकऱ्यांमधील बनावट जात प्रमाणपत्राच्या धोक्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी कपड्यांशिवाय रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी आपला निषेध नोंदवला. बनावट जात प्रमाणपत्रांवर कारवाई करण्याची मागणी नवीन नसली तरी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निषेध करण्यात आला आहे.
ट्विट
Chhattisgarh: Men Hold Nude Protest In Raipur, Demand Action Against Employees With Fake Caste Certificates; Shocking Video Emerges #ChhattisgarhNews #Chhattisgarh #Raipur #FakeCasteCertificates #Chhattisgarhprotesthttps://t.co/EufMMcBQb2
— Free Press Journal (@fpjindia) July 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)