फटाके फोडताना झालेल्या स्फोटात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यात घडली. हा मुलगा एका काचेच्या ग्लासमध्ये फटाके फोडत होता. या वेळी झालेल्या स्फोटामध्ये ग्लासची काच पोटात घुसली तसेच त्याच्या शरीराला इतर ठिकाणीही गंभीर जखमा झाल्या. यामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. शौर्य सिंह असे या मुलाचे नाव आहे. शौर्य याने आपल्यासोबत घडलेला प्रकार प्रथम लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा इयत्ता सातवीतील विद्यार्थी होता. त्याला मुरादाबादमधील उच्च वैद्यकीय केंद्रात पाठवले जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, घडल्या प्रकाराबद्दल माहिती देताना नूरपूरचे एसएचओ संजय कुमार म्हणाले, "ही घटना बिजनौरमधील मोराना गावात घडली. आम्ही गावात चौकशीसाठी गेलो होतो, परंतु मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिस तक्रार दाखल केली नाही."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)