कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये दिवाळीच्या दिवशी मित्रांनी लावलेल्या पैजेमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अहवालानुसार, 31 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी 32 वर्षीय शबरिशला त्याच्या मित्रांनी कोननकुंटे येथे फटाक्यांनी भरलेल्या बॉक्सवर बसवले. फटाक्याच्या पेटीवर बसण्याची पैज जिंकल्यास त्याच्या मित्रांनी त्याला ऑटोरिक्षा खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. काही पैसे मिळतील या आशेने शबरिश काहीही विचार न करता फटाक्याच्या पेटीवर बसला. मात्र या बॉक्सचा स्फोट होताच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
डीसीपी साऊथ लोकेश यांच्या म्हणण्यानुसार, शबरिश आणि त्याच्या मित्रांनी दिवाळीत भरपूर मद्यपान केले होते. यावेळी मित्रांनी शबरिशला फटाक्यांनी भरलेल्या डब्यावर बसण्याचे आव्हान दिले. नशेत असलेल्या शबरिशने विचार न करता आव्हान स्वीकारले. त्यानंतर मित्रांनी या बॉक्सला आग लावली, ज्यामध्ये शबरिशचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शबरिशच्या कुटुंबीयांनी त्याच्या 6 मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या 6 जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. (हेही वाचा: Viral Video: बेंगळुरूमध्ये मुख्य रस्त्यावर स्कूटर चालवतांना तरुणांनी फोडले फटके, पोलिसांनी केली कारवाई)
Dies After Sitting on Bursting Firecrackers in Bengaluru-
In a heartbreaking incident in Konanakunte, 32-year-old Shabarish tragically lost his life when a box of firecrackers exploded beneath him. According to reports, Shabarish’s friends had dared him to sit on the box filled with firecrackers, promising to buy him an autorickshaw if… pic.twitter.com/PerMA6AP3q
— Karnataka Portfolio (@karnatakaportf) November 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)