बेंगळुरूच्या व्हाईटफील्डच्या होप फार्म येथे रविवारी पहाटे रस्त्यावर पडलेल्या एका वायरवर पाय पडल्याने, 23 वर्षीय महिला आणि तिच्या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 6 वाजता घडली. महिला सौंदर्या आपल्या लहान मुलीसह तामिळनाडूहून घरी परतत होती त्यावेळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच काडूगोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आणि दोघींनाही तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र दोघांची दुर्दैवी अंत झाला. याबाबत बेंगळुरू वीज पुरवठा कंपनी (BESCOM) अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार सूर्या यांनी, या घटनेबाबत जबाबदार असलेल्या अधिकार्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबाला लवकरात लवकर पुरेशी भरपाई दिली जावी असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Firecracker In Hen’s Private Part: कोंबडीच्या गुप्तांगात फटाका फोडला, आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील क्रुर घटना)
The electrocution at Hopefarm Junction, where a young woman lost her life, is heartbreaking and highlights the urgency for BESCOM to adopt preventive measures. A heightened sense of responsibility from BESCOM is crucial in averting such incidents and ensuring a safer environment. pic.twitter.com/yZhp9YBNf7
— P C Mohan (@PCMohanMP) November 19, 2023
It’s disturbing to learn that mother & her 9-month-old baby were charred to death after accidently stepping on live wire lying on footpath at Hopefarm, Whitefield.
Negligence of BESCOM authorities has resulted in two innocent lives being lost. An FIR should be filed against the… pic.twitter.com/0PmMRdVNRR
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) November 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)