एकीकडे इंडिया युतीचे सरकार सत्तेत आल्यास देशातील महिलांच्या खात्यात 8,500 रुपये जमा करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या तोंडावर हजारो महिलांनी पैसे मिळण्याच्या आशेने टपाल कार्यालयात धाव घेतल्याचे दिसून आले. बेंगळुरूमध्ये अशी अफवा पसरली होती की, काही राजकीय पक्ष महिलांच्या पोस्ट ऑफिस खात्यात 8,000 रुपये ट्रान्सफर करणार आहेत. त्यानंतर हजारो महिला खाते उघडण्यासाठी बेंगळुरू जनरल पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्या. नंतर दिसून आले की, याचा राहुल गांधींच्या 8,500 रुपयांच्या आश्वासनाशी काहीही संबंध नाही.

अहवालानुसार, पोस्टल विभाग इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये उघडलेल्या खात्यांमध्ये 8,000 रुपये जमा करत असल्याची अफवा पसरली होती. ही अफवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आणि स्थानिक ग्रुपमध्ये पसरवण्यात आली. सोमवार हा नोंदणीचा ​​शेवटचा दिवस असल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्यानंतर वृद्ध, स्तनदा महिला, लहान मुले असलेल्या महिला आदींसह अनेक महिलांनी खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस गाठले. आश्चर्यकारक बाब म्हणजे खाते उघडण्यासाठी महिला पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभ्या होत्या. अखेर टपाल खात्याने असा कोणताही रोख रक्कम प्रोत्साहन कार्यक्रम किंवा उपक्रम जाहीर केला नसल्याचे सांगितले. (हेही वाचा: IndiGo's New Feature For Female Passengers: महिला प्रवाशांसाठी इंडिगोने सादर केले नवे फिचर; प्रवास होणार आणखी आरामदायक, जाणून घ्या सविस्तर)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)