आसाममधील सिलचर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलेले नवजात अर्भक अंतिम संस्कारापूर्वी जिवंत आढळले आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. वृत्तानुसार, मुलाचे वडील, 29 वर्षीय रतन दास यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री ते आपल्या सहा महिन्यांच्या गर्भवती पत्नीला सिलचरमधील एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना सांगितले की गर्भधारणेत समस्या असल्याने ते आई किंवा मुलापैकी एकालाच वाचवू शकतील. त्यावेळी दास यांनी मुलाला वाचवण्यास सांगितले. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने मृत मुलाला जन्म दिला आहे. बुधवारी सकाळी त्यांना मृतदेह आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळाले.

मात्र जेव्हा कुटुंबीय सिलचर स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांना मुल जिवंत असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले व उपचार सुरु केले. या घटनेनंतर सिलचरमधील मालिनीबिल परिसरातील रहिवाशांनी निष्काळजीपणाबाबत निदर्शने केली. कुटुंबीयांनी रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Haryana Shocker: फरिदाबादमध्ये दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला 4 वर्षांचा मुलगा, उपचारादरम्यान मृत्यू; समोर आला धक्कादायक व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)