Attempted Murder Caught on Camera: आंध्र प्रदेशमधून चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या अनकापल्ली येथे एका व्यक्तीने सोनसाखळी चोरण्यासाठी वृद्ध महिलेचा जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने महिलेचा गळा टॉवेलने आवळला. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. साधारण 1 मिनिट 28 सेकंदाच्या व्हिडिओ स्लिपमध्ये केबल कामगार असलेला आरोपी गोविंद ज्येष्ठ नागरिक लक्ष्मी नारायणम्मा यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करत असताना आणि त्याचवेळी त्यांची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अहवालानुसार, आरोपीने वृद्ध महिलेची आठ तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावण्यासाठी टॉवेलने तिला मारण्याचा प्रयत्न केला. वृद्ध महिला अनकापल्ली गवारापलेम पार्क सेंटरमधील तिच्या घरी एकटी होती तेव्हा गोविंदने घरात प्रवेश केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. (हेही वाचा: Fight Among Passengers in Delhi Metro: दिल्ली मेट्रोत प्रवाशांमध्ये पुन्हा हाणामारी; पहा व्हायरल व्हिडिओ)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)