Fight Among Passengers in Delhi Metro: दिल्ली मेट्रोत प्रवाशांमध्ये पुन्हा हाणामारी; पहा व्हायरल व्हिडिओ
Delhi Metro (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

Fight Among Passengers in Delhi Metro: दिल्ली मेट्रो ट्रेन (Delhi Metro) मध्ये तीन प्रवाशांमध्ये जोरदार मारामारी झाली. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ X, पूर्वी Twitter वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दोन प्रवासी तिसऱ्या प्रवाशाशी काही मुद्द्यांवरून वाद घालत होते. तिसऱ्या व्यक्तीने शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर हाणामारीला हिंसक वळण लागले आणि दोन प्रवाशांनी तिसऱ्या व्यक्तीला घेरण्याचा प्रयत्न केला.  (हेही वाचा -Delhi Metro Pole Dance Viral Video: दिल्ली मेट्रोत रोमान्स नंतर चक्क 'हे' पाहायला मिळतेय ? पोल डान्सचा व्हिडिओ पाहताच नेटकरी संतापले (Watch Video))

व्हिडिओमध्ये सुरुवातील दोन प्रवाशी दुसऱ्या प्रवाशाशी भांडण करत आहे. त्यानंतर तिसरा प्रवासी शिवीगाळ करतो आणि यामुळे इतर दोन प्रवाशांना राग येतो. त्यापैकी एकाने शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर लगेचचं दुसरी व्यक्ती त्याला लाथ मारू लागते. तिसरा प्रवासी देखील इतर दोन प्रवाशांना मारण्याचा प्रयत्न करतो. दिल्ली मेट्रो सेवेच्या कोणत्या मार्गावर ही घटना घडली हे अस्पष्ट राहिले. (हेही वाचा -Delhi Metro Women Fight: दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा गोंधळ! दोन महिलांमध्ये जोरदार भांडण, पहा व्हायरल व्हिडिओ)

पहा व्हिडिओ - 

शुक्रवारी, 26 जानेवारी रोजी दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये एका पाकीट मारणाऱ्या चोराला पकडण्यात आले होते. आरोपी लष्कराच्या जवानाचे पाकीट चोरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याने पाकीट ट्रेनमध्येच टाकून दिले. त्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला पकडून मारहाण केली. त्याला एका स्टेशनवर मेट्रो ट्रेनमधूनही ढकलून देण्यात आले. X वर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.