Delhi Metro Women Fight: दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा गोंधळ! दोन महिलांमध्ये जोरदार भांडण, पहा व्हायरल व्हिडिओ
Delhi Metro (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

Delhi Metro Women Fight: दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) प्रवाशांमध्ये सीटवरून झालेल्या वादाचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन महिलांमधील सीटवरून झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांवर रागाने ओरडताना आणि एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. आजूबाजूचे प्रवासी दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र महिला कोणाचही ऐकत नाहीत. व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, एक महिला दुसऱ्या महिलेचे केस ओढू लागते, त्यानंतर दोघींमध्ये हाणामारी होते.

ही घटना कोणत्या मार्गावर आणि केव्हा घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक या घटनेचा निषेध करत आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन लाजिरवाणे असल्याचे म्हणत आहेत. (हेही वाचा -Delhi Metro Pole Dance Viral Video: दिल्ली मेट्रोत रोमान्स नंतर चक्क 'हे' पाहायला मिळतेय ? पोल डान्सचा व्हिडिओ पाहताच नेटकरी संतापले (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांत अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये, दोन पुरुषांमधील जागेच्या वादाचा एक व्हिडिओ, ज्यामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्याला चापट मारली होती. ऑगस्ट 2023 मध्ये, एका महिला प्रवाशाने एका वृद्ध महिलेला तिची सीट न दिल्याने धक्काबुक्की केली होती.