बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या वांद्रे पश्चिम येथील घरात गुरुवारी पहाटे मोठी चोरीची घटना घडली. चोरीदरम्यान सैफ अली खानवरही चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या घरात प्रवेश केला. यानंतर सैफ आणि घुसखोर यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही स्कॅन करून हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. कडेकोट बंदोबस्तात हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात घुसला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याची माहिती सध्या उपलब्ध नाही. पण करिश्मा कपूरने 9 तासांपूर्वी इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तिने बहीण करीना कपूर, मैत्रिणी रिया आणि सोनम कपूरसोबत पार्टी केली. करिनाने बहीण करिश्माची ही पोस्ट तिच्या अकाऊंटवर पुन्हा शेअर केली आहे. मात्र, सैफवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी करीना तिच्या गर्ल गँगसोबत होती की, घरी पोहोचली होती, याबाबत कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. (हेही वाचा: Rashmika Mandanna Health Update: जिममध्ये दुखापत झाल्यानंतर रश्मिका मंदान्ना आता कशी आहे? सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिलं अपडेट)

Attack On Saif Ali Khan:

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)