Rashmika Mandanna (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Rashmika Mandanna Health Update: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ही दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकाने बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूरसोबत रश्मिकाचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट थिएटरमध्ये खूप यशस्वी झाला. नुकतीचं ती अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2' मध्ये दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1800 कोटींचा व्यवसाय केला. पुष्पा 2 चित्रपट 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आता रश्मिका लवकरच अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.

व्यायाम करताना जखमी झाली अभिनेत्री -

'पुष्पा 2' फेम रश्मिका जिममध्ये व्यायाम करताना जखमी झाली. यामुळे तिच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण सध्या थांबवण्यात आले आहे. तिचे चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु दुखापतीमुळे शुटिंगला ब्रेक द्यावा लागला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे. अलीकडेच, रश्मिकाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आणि तिच्या दुखापतीबद्दलची अपडेट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. (हेही वाचा -Rashmika Mandanna Confirms Her Relationship: खाजगी फोटो लीक होताच रश्मिका मंदान्नाने दिली आपल्या नात्याची कबुली; लग्नाच्या प्रश्नावर दिले 'हे' उत्तर, पहा व्हिडिओ)

प्रकृतीसंदर्भात रश्मिकाने सोशल मीडियावर दिले अपडेट -

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या प्रकृतीचे अपडेट शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने तिची प्रकृती आता कशी आहे आणि ती तिच्या कामावर परत कधी येणार हे सांगितले आहे. रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी जिममध्ये स्वतःला दुखापत केली. आता मी पुढचे काही आठवडे किंवा महिने 'हॉप मोड'मध्ये आहे. आता देवालाच माहिती आहे की, 'थमा', 'सिकंदर' आणि 'कुबेर' च्या सेटवर मी कधी परतणार!' (हेही वाचा -लवकरच अभिनेता Vijay Deverakonda आणि अभिनेत्री Rashmika Mandanna अडकणार विवाहबंधनात? फेब्रुवारीमध्ये साखरपुडा होण्याची शक्यता)

रश्मिका मंदानाचे वर्कफ्रंट -

रश्मिका मंदान्ना शेवटची अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2' मध्ये दिसली होती. यानंतर, ती सलमान खानचा 'सिकंदर', आयुष्मान खुरानाचा 'थामा' आणि 'छावा', 'कुबेरा' आणि विकी कौशलसोबत 'द गर्लफ्रेंड' यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिचे चाहते या सर्व चित्रपटांबद्दल खूप उत्सुक आहेत. चाहते रश्मिकाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.