'आसाममध्ये आणखी एक श्रद्धा वालकर' अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे सांगत आसाम पोलिसांनी या पोस्टचे खंडण केले आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या हेतूने समाजकंटकांच्या एका गटाने ही पोस्ट सोशल मीडियावर जाणीवपूर्वक शेअर केली असल्याचेही आसाम पोलिसांनी म्हटले आहे. या समाजकंटकांवर लवकरच काहवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, राज्य पोलिसांनी या पोस्टला "बनावट" बातमी म्हणून संबोधले आणि ते पोर्तुगीज ब्लॉगवरून घेतल्याचे सांगितले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)