इराणमधील हिजाबविरोधी निदर्शनाची आग भारतातही पोहोचली आहे. केरळमधील कोझिकोड टाऊन हॉलसमोर मुस्लिम महिलांच्या एका गटाने हिजाब जाळून इराणमधील महिलांना पाठींबा दर्शवला. इराणमधील हिजाबविरोधी चळवळीशी एकजुट दाखवत मुस्लिम महिलांनी हिजाब जाळला. केरळ युक्तवादी संगमने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ही घटना घडली. भारतातील कोणत्याही संघटनेने हिजाब जाळण्याची ही पहिलीच घटना आहे. संघटनेच्या सहा मुस्लिम महिलांनी हिजाब जाळण्याच्या या कृत्याचे नेतृत्व केले. कोझिकोडमधील या आंदोलनाला अधिक महत्त्व आहे कारण या भागात मुस्लिम समाजाचे वर्चस्व आहे.
Muslim Women In India Take Cue From Iran, Set Hijab Ablaze In Kerala As Protests Rock The World.#TNDIGITALVIDEOS #Hijab #Kerala #Iran pic.twitter.com/VMDkYyOaoi
— TIMES NOW (@TimesNow) November 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)