गुजरातमध्ये पोलिसांनी एका स्कूटर चालकाचा जीव वाचवला आहे. स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणाच्या अचानक छातीत दुखू लागल्याने तो स्कूटर थांबवून बाजूला बसला. यानंतर शेजारी उपस्थित असलेल्या पोलिसांना तरुणाला अस्वस्थ वाटत असल्याचे जाणवले व ते ताबडतोब मदतीसाठी पोहोचले. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याचे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले, त्यानंतर लगेचच पोलिसांनी प्राथमिक उपचार म्हणून सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले. यानंतर रुग्णवाहिका बोलावून तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत तरुणाला शुद्ध आली होती. गुजरातमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण दिले जाते. सीपीआर प्रशिक्षण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी किती उपयुक्त आहे हे अहमदाबादच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले. (हेही वाचा: Mumbai Road Accident Video: मुंबईत दोन बसची धडक, घटनेत डॉक्टरचा मृत्यू, पाहा व्हिडीओ)
◆ गुजरात में पुलिस वालों ने बचाई स्कूटर चालक की जान
◆ गुजरात में सरकारी कर्मचारियों को दी जाती है सीपीआर ट्रेनिंग #Gujarat | #CPR | #CprTraining | pic.twitter.com/RpmdBDWGeU
— News24 (@news24tvchannel) June 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)