आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पॅन-आधार लिंकिंगसाठी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली गेली आहे. आता नागरिक 30 जूनपर्यंत त्यांचे आधार-पॅन कार्ड लिंक करू शकतात. परंतु यासाठी दंड आकाराला जाईल. आयकर विभागाच्या नियमांनुसार आता लिंकिंगसाठी 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. पॅन-आधार लिंक करण्यापूर्वी तुम्हाला 1,000 रुपये भरावे लागतील, त्यानंतर तुम्ही लिंकिंग विनंती सबमिट करू शकाल. याआधी आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती. जर तुम्ही अद्याप पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल, तर ते ऑनलाइन माध्यमातून सहज करता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)