IB Chief Tapan Deka Gets an Extension: इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख तपन कुमार डेका यांना सेवेत एक वर्षाची मुदतवाढ

डेका हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने त्यांना पुन्हा एकदा सेवेत एक वर्षाची मुदतवाढ देऊन मोठी जबाबदारी दिली आहे.

IB Chief Tapan Deka Gets an Extension: इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख तपन कुमार डेका यांना सेवेत एक वर्षाची मुदतवाढ
IB Chief Tapan Deka

IB Chief Tapan Deka Gets an Extension: इंटेलिजेंस ब्युरो (IB) प्रमुख तपन कुमार डेका यांना सोमवारी कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, जून 2025 पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. तपन डेका हे हिमाचल प्रदेश केडरचे 1988 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुप्तचर विभागाचे संचालक म्हणून डेका यांची सेवा 30 जून 2024 नंतर, एक वर्षाच्या कालावधीसाठी वाढविण्यास मंजुरी दिली आहे. डेका हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने त्यांना पुन्हा एकदा सेवेत एक वर्षाची मुदतवाढ देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. डेका यांनी आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ इंटेलिजन्स ब्युरोमध्ये घालवला आहे. ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अतिरिक्त संचालकही राहिले आहेत. (हेही वाचा: Kerala Rename: केरळ राज्याचे नाव बदलून 'केरळम' करण्याचा निर्णय; विधानसभेत ठराव मंजूर)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2024 11:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).