Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्टच्या वरच्या भागात बुधवारी जोरदार हिमस्खलन झाल्याची माहिती मिळत आहे. हिमस्खलनात जीवितहानी होण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अनेक परदेशी प्रवासीही हा हिमस्खलनाच्या तडाख्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार व्यक्ती - दोन परदेशी स्कीअर आणि दोन मार्गदर्शक- बेपत्ता आहेत. या घटनेबाबत बारामुल्ला पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी इतर यंत्रणांसह बचावकार्य सुरू केले आहे.
#WATCH | J&K: Avalanche hit the Afarwat peak at famous ski resort in Gulmarg. Rescue operation launched by Baramulla Police along with other agencies. Reports of some skiers being trapped are being corroborated, Baramulla Police say. pic.twitter.com/zsFBfBL0od
— ANI (@ANI) February 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)