Sonmarg Avalanche Viral Video: जम्मू-काश्मीरच्या सोनमर्ग (Sonmarg) मध्ये हिमस्खलनाचा (Sonmarg Avalanche) एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बर्फाच्या रूपात पर्वतावरून पृथ्वीवर अचानक कशा प्रकारे हिमस्खलन झालं. हिमस्खलनामुळे जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी बर्फाचे वादळ पाहून अंगावर काटा येतो. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमर्गच्या सरबल भागात झोजिला टनेल वर्कशॉपजवळ हिमस्खलन झाले.

डोंगरावरून बर्फाचे वादळ येताच परिसर रिकामा करण्यात आला. वादळ रिकाम्या जागेत आले, त्यामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, कार्यशाळेतील अधिकारी व कर्मचारीही सुरक्षित आहेत. गेल्या एक आठवड्यापासून काश्मीरमध्ये सतत बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला होता. लोकांना आणि पर्यटकांना डोंगराळ भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा -Woman Damages Cab Door, Walks Away: वर्दळीच्या भर रस्त्यात महिलेने कॅबचा उघडला दरवाजा; रिक्षाच्या धडकेत नुकसान (Watch Video)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)