केदारनाथच्या गांधी सरोवरवर आज पहाटे ५ वाजता हिमस्खलन झाला. मात्र, अद्याप कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी हिमालयाच्या उंच भागातील हिमनद्या वितळल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ दरवर्षी पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करते. मात्र यावेळी निसर्गाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. गांधी सरोवरावर पहाटे हिमस्खलन झाल्याने संपूर्ण परिसरात बर्फाचे वादळ निर्माण झाले होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)