China's Tallest Waterfall Is Fake: चीनची जगभरात नाचक्की; देशातील सर्वात उंच Yuntai Mountain धबधबा निघाला बनावट, पाईपमधून पुरवले जात आहे पाणी, व्हिडिओ व्हायरल (Watch)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेअर केल्या या व्हिडिओमध्ये धबधब्याच्या वरच्या डोंगरावरील खडकावर तयार केलेल्या कृत्रिम संरचनेतून पाणी बाहेर पडताना दिसत आहे.
China's Tallest Waterfall Is Fake: चीनमध्ये युंटाई माउंटन धबधबा (Yuntai Mountain Waterfall) नावाचे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा देशातील सर्वात मोठा धबधबा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता हा धबधबा खोटा असल्याचे समोर आले आहे. या धबधब्याला चक्क पाइपद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सोशल मिडियावर या धबधब्याचा एक व्हिडिओ समोर आला असून, ज्यामध्ये पाइपद्वारे पाणी पुरवले जात असल्याचे दिसत आहे. एका गिर्यारोहकाने हा खुलासा केला, त्यानंतर उद्यान अधिकाऱ्यांना हा धबधबा खोटा असल्याचे मान्य करावे लागले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरात चीनची बदनामी होत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेअर केल्या या व्हिडिओमध्ये धबधब्याच्या वरच्या डोंगरावरील खडकावर तयार केलेल्या कृत्रिम संरचनेतून पाणी बाहेर पडताना दिसत आहे. पार्क अधिकारी या धबधब्याला आशियातील सर्वात उंच धबधबा म्हणतात, जो 314 मीटर उंचीवरून कोसळतो. हा धबधबा पूर्व चीनच्या हेनान प्रांतात आहे. आता हे झरे नैसर्गिकरित्या वाहत नसून पाईपद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे मान्य करण्यात आले आहे. (हेही वाचा: Lions Viral Video: जंगलाच्या मधोमध रस्त्यावर दोन भयंकर सिंह, न घाबरता एक व्यक्ती बाईकवरून त्यांच्या जवळून गेला)
पहा व्हिडिओ-
NEW: Chinese officials are forced to apologize after a hiker discovers a secret water pipe feeding China’s tallest waterfall
Millions of tourists visit the 1,024-foot-tall Yuntai Mountain Waterfall annually, attracted by its ancient geological formations over a billion years old… pic.twitter.com/mw3u9NK1xN
— Unlimited L's (@unlimited_ls) June 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2024 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

