Kedarnath Accident: उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये एक भीषण अपघात घडला. डोंगरावरून पडलेल्या दगडांमुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला (Landslide)आहे. केदारनाथ पादचारी मार्गावर हा अपघात झाला. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात म्हणजे पावसाळ्यात डोंगरी भागात धोकादायक परिस्थितीचे उदाहरण आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, रस्ते खचणे, पूर येणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. (हेही वाचा:Uttarakhand: रुद्रप्रयागमध्ये बांधकामाधीन सिग्नेचर पूल कोसळला (Watch Video) )

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)