Sikkim Landslide Video: सिक्कीममध्ये पहाटे दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तीस्ता स्टेज 5 धरणाचे पॉवर स्टेशन नष्ट झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संपूर्ण वीज केंद्र ढिगाऱ्याखाली गाडल्याचे पाहायला मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने छोटे-मोठे दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे हे वीज केंद्रही धोक्यात आले होते. या कारणास्तव हे वीज केंद्र काही दिवसांपूर्वी रिकामे करण्यात आले होते. वेळीच बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्विटरवर @JournoAaritra या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.हेही वाचा: Wayanad Landslide: वातावरणीय बदलांमुळे पावसाने धारण केले रौद्र रूप; वायनाड भूस्खलन आपत्तीवर शास्त्रज्ञांचा धक्कादायक दावा

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)