Uttarakhand: उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथील नारकोटा येथे बांधकाम सुरु असलेला पुल कोसळला. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेन कोणतीही दुखापत झालेली नाही. जास्त वजनाने हा पूल तुटला असल्याचे सांगत आहे. पुल कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रसाशसाने या घटनेनंतर पूलाची पाहणी केली आहे. अंदाजे या पूलाला 76 कोटी खर्च लागला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा पूल अर्धवट कोसळला. अनेक वर्षापासून पूलाच्या बांधकामाचे काम सुरु होते. पूलाच्या चौकाटाचे देखील भरपूर नुकसान झाले आहे. (हेही वाचा - महापालिकेविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यांवर लिहिले ‘बीएमसी विकास’ (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)