Hydrabad News: हैद्राबादमध्ये तेलंगणा येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कृषी विद्यापीठातील जमीन देण्याच्या निषेधार्थ आंंदोलन सुरु होते. दरम्यान एका पोलिसांनी एका तरूणीचा पाठलाग करत तिचे केस ओढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन पोलिस स्कुटीवर एका आंदोलक तरुणाचा पाठलाग करत आहे. पाठलाग करता करता पोलिस महिलेने तरुणाचे केस ओढलं. घटनेत ती खाली पडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. प्राध्यापक जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उच्च न्यायालयाच्या बांधकामासाठी विद्यापीठाची जमीन देण्याच्या विरोधात विद्यार्थी गटाने केलेल्या आंदोलन करत असल्याच्या वेळीस ही घटना घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)