खारदुंगला येथून जाणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच रस्ता, ज्यावरून मोटार वाहने जातात, हिवाळ्यातही हा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) कडून हा बर्फ हटवला जात आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशमधील आठ जिल्ह्यांमध्ये मोठी बर्फवृष्टी झालीय. हिमवर्षामुळं 250 रस्ते बंद झाले असून राज्यातील बस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लेहमधील खारदुंगला टॉप रोड हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच रस्ता आहे. या मार्गावरून पाकिस्तान आणि चीनच्या सीमेसाठी मोक्याचे रस्ते जातात.
Tweet
#WATCH The world’s second-highest motorable road passing through Khardung La has been kept open even during extreme winters by Border Roads Organisation through snow clearing operations. Strategic roads to both the Pakistan & China border go through this pass.
(Source: BRO) pic.twitter.com/3aMJxdKaF4
— ANI (@ANI) January 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)