Saudi Arabian Desert Sees Snowfall: उष्ण वाळवंटात अचानक बर्फ पडताना दिसला तर काय म्हणाल? कदाचित तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण हे एका देशात घडले आहे, होय, जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवणे इथल्या लोकांनाही कठीण झाले आहे. तर सौदी अरेबियाच्या विशाल वाळवंटामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. अलीकडेच इथल्या अल-जौफ भागात झालेल्या जोरदार हिमवृष्टीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बर्फवृष्टीची ही घटना स्थानिक लोकांसाठीच आश्चर्यकारक नाही तर, जगभरातील लोकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. या वाळवंटातील बर्फवृष्टीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल-जौफ भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. या बर्फवृष्टीमुळे वाळवंटात पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर पसरली आहे. असा दावा केला जात आहे की, असा हिमवर्षाव येथे कधीच पाहिला नाही. हे ठिकाण नेहमीच गरम असते, मात्र आता बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसराचे तापमानही कमी झाले आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे सर्व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. (हेही वाचा: Mumbai Healthcare Facilities: मुंबईत मधुमेह सर्वात प्राणघातक आजार, सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता; Praja Foundation ने प्रसिद्ध केला शहरीत्ल आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकणारा धक्कादायक अहवाल)

Saudi Arabian Desert Sees Snowfall:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)