Gurugram Waterlogging:  हरियाणा राज्यातील गुरुग्राम सेक्टर 30  परिसरत जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. चोहीकडे पाणीच पाणी. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल बेहाल झालेले पाहायला मिळत आहे. विशेषत: पिझ्झा डिलेव्हरी करणाऱ्या तरुणाला पावसामुळे गैरसोयचा सामना करावा लागत आहे. PTI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. पावसाचे  पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना कमालीचे कसरत करावे लागत आहे. याच पार्श्वभुमीवर प्रशासनाने देखील शाळा आणि कॉलेज सोमवारी बंद ठेवण्यातचे आदेश दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)