अवघ्या 10 मिनिटांत अन्न वितरण करण्यासाठी  ब्लिंकिट आपले नवीन ‘बिस्ट्रो’ लाँच केले आहे. याद्वारे उच्च-गुणवत्तेचे, कॅन्टीन-शैलीतील खाद्यपदार्थ फक्त 10 मिनिटांत तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जातील. सध्या ही सेवा गुरुग्राममध्ये काही ठिकाणी सुरु आहे. याबाबत 10 जानेवारी रोजी, ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धांडसा यांनी X वर माहिती दिली. ते म्हणतात, बिस्ट्रो हे ब्लिंकिट आणि झोमॅटोच्या बाहेरील नवीन ॲप आहे. या सेवेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले जाणार नाहीत, तसेच ते मायक्रोवेव्हमध्ये गरम केले जाणार नाहीत. बिस्ट्रोमधील सर्व पदार्थ नैसर्गिक आणि आरोग्यदायी पद्धती वापरून तयार केले जातात, ज्यामुळे ग्राहकांना ताजेपणा आणि गुणवत्तेची पूर्ण खात्री मिळेल. या सेवेद्वारे असे पदार्थ निवडले जातील, जे अवघ्या 5 मिनिटांत बनू शकतील. या सेवेतील सर्व पदार्थ हेल्दी असून, ज्यामध्ये चवीबबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. धांडसा यांनी सांगितले की, कंपनी पाच मिनिटांत किंवा त्यापेक्षा कमी वेळात डिश तयार करण्यासाठी संशोधन, पायाभूत सुविधा आणि संशोधन आणि विकासात मोठी गुंतवणूक करत आहे. (हेही वाचा: Swiggy Snacc: झोमॅटो, झेप्टोशी स्पर्धा करण्यासाठी स्विगीने लाँच केले नवीन ॲप 'स्नॅक'; 10-15 मिनिटांत फूड डिलिव्हरी होणार)

Blinkit Launches Bistro App: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)