FIFA World Cup 2022 Final: सोमवारी पहाटे केरळच्या विविध भागात विश्वचषक उत्सवाला हिंसक वळण लागले कारण चाहत्यांनी कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. थलासेरीमध्ये उत्सवादरम्यान एका उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच आणखी एका घटनेत, कोचीमध्ये फुटबॉल चाहत्यांच्या गटाने कलूर स्टेडियमजवळ वाहतूक रोखल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. एका पोलिसाने त्यांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आणि चाहत्यांना पळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी त्याच्यांवर हल्ला केला. चाहत्यांनी पोलिसाचे पाय धरून ओढल्याचे दृश्य नंतर समोर आले. या घटनेनंतर अधिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पाच जणांना अटक केली. ही मंडळी दारूच्या नशेत असल्याचा संशय आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)