West Bengal Scraps NEET: तामिळनाडू, कर्नाटकनंतर आता पश्चिम बंगाल विधानसभेतही नीटविरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. बंगाल विधानसभेत नीट परीक्षेतील गडबडीविरोधातील ठराव मंजूर करण्यात आला. बंगाल सरकारने सांगितले की, बंगालला मेडिकलसाठी नीट परीक्षेपासून दूर ठेवायचे आहे. बंगालपूर्वी तमिळनाडू आणि कर्नाटक विधानसभेतही असाच प्रस्ताव मंजूर झाला होता. या तीनही राज्यांचे म्हणणे आहे की, त्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तीच जुनी पद्धत हवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या एका दिवसानंतर बंगाल विधानसभेने हा ठराव मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे सांगितले होते. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम बंगाल राज्य सरकार नवीन प्रवेश परीक्षा सुरू करणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि नीटच्या केंद्रीकृत स्वरूपावरील चिंता दूर करणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. (हेही वाचा: EPFO New Schemes For Employment: रोजगारनिर्मितीसाठी ईपीएफओ द्वारे तीन नव्या योजना; अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातही घोषणा)
पहा पोस्ट-
West Bengal Legislative Assembly passes resolution against NEET in assembly today.
— ANI (@ANI) July 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)