UPSC Results Declared: UPSC CSE परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2023 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) ने बाजी मारून अव्वल स्थान पटकावले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर UPSC CSE निकाल 2023 तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

5 टॉपर्सची नावे -

  • UPSC CSE परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने पहिला क्रमांका मिळवला आहे.
  • अनिमेष प्रधान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • डोनुरू अनन्या रेड्डी यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या क्रमांकावर आहे.
  • रुहानी यांचे नाव पाचव्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)