Balasore Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातावर केंद्रीय अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. या दुर्घटनेप्रकरणी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ विभाग अभियंता अरुण कुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना सीबीआयने सीआरपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत अटक केली. 2 जून 2023 रोजी ओडिशात मालगाडी, 12841 कोरोमंडल एक्सप्रेस आणि 12864 बेंगळुरू-हावडा एसएफ एक्सप्रेससह तीन गाड्यांची टक्कर झाली. या घटनेत 280 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत. (हेही वाचा -Chhattisgarh Accident: पीएम मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या बसला अपघात, दोघांचा मृत्यू)
Balasore train accident | CBI has arrested 3 people, senior Section engineer Arun Kumar Mohanta, section engineer Mohammad Amir Khan & technician Pappu Kumar, under sections 304 and 201 CrPC pic.twitter.com/EkXTYFHncd
— ANI (@ANI) July 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)