Bull Inside Shop in Delhi: देशभरात भटक्या जनावरांचा उपद्रव चांगलाच वाढला आहे. त्याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. दिल्लीतील संगम विहार भागातील एका मोबाईल रिपेअर दुकानात अचानक बैल घुसला (Bull Inside Shop in Delhi). एका उडीतच तो दुकानाच्या आतल्या रूममध्ये पोहोचला. तिथे काही कामगार काम करत होते. बैल अचानक आल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. दुकाना बाहेर एक जण उभा होता. बैलाला पाहून तेथून पळ काढला. मात्र, आत मध्ये असलेल्या दोघांपैकी एक खुर्चीच्या मागे लपला, तर दुसरा वर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर बैल दुकाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला ते जमत नव्हते. (हेही वाचा :Tiger's Hunt Viral Video: जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वाघाने केली शिकार, व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)