अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेकसाठी (Ram Temple Pran Pratishtha Ceremony) संपूर्ण देश उत्सुक आहे. लोक या ऐतिहासिक दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, मनन कुमार मिश्रा, यांनी अधिकृतपणे भारताचे सरन्यायाधीश डॉ. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून 22 जानेवारी 2024 रोजी देशव्यापी न्यायालयीन सुट्टी देण्याची विनंती केली आहे. (हे देखील वाचा: Ram Temple Pran Pratishtha Ceremony: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल, जाणून घ्या सविस्तर)
#BREAKING Bar Council of India Chairman writes to CJI DY Chandrachud requesting for a judicial holiday across all courts on January 22 on the occasion of #Pranpratishtha ceremony of #LordRam in #Ayodhya pic.twitter.com/zqZMaxraFN
— Bar & Bench (@barandbench) January 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)