Bengaluru Rameshwaram Cafe Blast: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट (Rameshwaram Cafe Blast) प्रकरणाशी संबंधित संशयिताचा आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. एजन्सीने त्याची ओळख पडताळून पाहण्यासाठी लोकांची मदत मागितली आहे. एका नवीन फुटेजमध्ये संशयित टी-शर्ट, फेस मास्क घातलेला आणि बॅग घेऊन जाताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, तो बंगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) बसमध्ये चढताना दिसत आहे. एनआयएने संबंधित संशयित व्यक्तीची माहिती देण्यासाठी नागरिकांना खालील क्रमांकावर कॉल करण्याची विनंती केली आहे. 08029510900, 8904241100 किंवा info.blr.nia@gov.in वर ईमेल करण्याची विनंती केली आहे. (वाचा - Bengaluru Cafe Blast: रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयित हल्लेखोराचे पहिले छायाचित्र आले समोर; बेंगळुरूमध्ये BMTC व्होल्वो बसमधून प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद)
पहा व्हिडिओ -
#WATCH | NIA releases a video of the suspect linked to the Bengaluru's Rameshwaram Cafe blast case, seeks citizens' help in ascertaining his identity
(Video source: NIA) pic.twitter.com/QVVJfy23ZN
— ANI (@ANI) March 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)