Bengaluru Cafe Blast: रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयित हल्लेखोराचे पहिले छायाचित्र आले समोर; बेंगळुरूमध्ये BMTC व्होल्वो बसमधून प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद
Rameshwaram Cafe Blast Suspect Photo (PC - X/@Girishvhp)

Bengaluru Cafe Blast: गेल्या आठवड्यात बेंगळुरूतील (Bengaluru) रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट (Rameswaram Cafe Blast) झाला होता. आता या बॉम्बस्फोटातील संशयिताचे नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यात तो मास्क आणि टोपीशिवाय बसमधून प्रवास करताना दिसत आहे. ब्रूकफिल्ड, ईस्ट बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी स्फोट झाला. ज्यात किमान 10 लोक जखमी झाले होते. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने यापूर्वी कॅफेमध्ये प्रवेश करताना टोपी, मास्क आणि चष्मा घातलेल्या संशयित बॉम्बरची प्रतिमा शेअर केली होती.

संशयिताला पकडण्यासाठी NIA कडून तपास सुरू -

सध्या या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएच्या पथकाने अलीकडेच कर्नाटकातील बेल्लारी शहराला भेट दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वाहनांमधील 10 हून अधिक NIA अधिकाऱ्यांनी बॉम्बरची माहिती गोळा केली, ज्यावरून हे उघड झाले की, कथित बॉम्बरने स्फोटानंतर बेंगळुरू ते तुमाकुरू असा प्रवास केला. अखेरीस तो बेल्लारी शहरात पोहोचला. एनआयएच्या दुसऱ्या पथकाने तुमाकुरु बसस्थानकाचा शोध घेतला, जिथे संशयित दिसला होता. बेल्लारी येथे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आंध्र प्रदेशातील मंत्रालयम येथून कर्नाटकच्या किनारपट्टीच्या गोकर्ण शहरासाठी बसमध्ये चढला. बॉम्बर उत्तरा कन्नड जिल्ह्यातील भटकळ शहरातील असू शकतो, अशी शंका आहे. (हेही वाचा -Bengaluru Rameshwaram Cafe Blast: बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमधील बॉम्बस्फोटाचे CCTV फुटेज आले समोर (Watch Video))

बॉम्बची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर -

एनआयएने संशयिताला पकडण्यासाठी तपास तीव्र केला आहे. एनआयएने बुधवारी संशयित व्यक्तीचा फोटो प्रसिद्ध केला. तसेच त्याच्याबद्दल माहिती किंवा सुगावा देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी खुलासा केला की, एनआयए आणि बेंगळुरू पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या विशेष शाखेच्या संयुक्त तपासावर भर देत, रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटासंदर्भात एनआयएला महत्त्वपूर्ण सुगावा मिळाला आहे. तथापी, 8 मार्च रोजी कॅफे पुन्हा सुरू होणार आहे.