Gurugram Accident: गुरुग्रामच्या सेक्टर-62 मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारला धडकल्याने दुचाकी कारखाली अडकली. मद्यधुंद कार चालकाने दुचाकी सुमारे 4 किलोमीटरपर्यंत ओढली. रस्त्यावर घासताना बाईकमधून ठिणग्या बाहेर पडत होत्या. बेधडक कारचालक आपली गाडी चालवत राहिला. लोकांनी गाडीचा पाठलाग करून ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार चालकाने त्याची पर्वा न करता कार चालवणे सुरूच ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस आरोपीचा तपास करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)