दिल्लीतील जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचारावरून राजकारण तापले आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जहांगीरपुरी हिंसाचाराबद्दल ट्विट केले आहे. न्यायाशिवाय बंधुभाव शक्य नसल्याचे ओवेसी म्हणाले. ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये केजरीवाल यांच्या ट्विटला रिट्विट करताना असेही लिहिले की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा मूर्खपणा आहे की ते गुन्हेगाराचे नाव सांगू शकत नाहीत, मिरवणुकीत बंदुका आणि पिस्तुल घेऊन फिरणाऱ्यांविरोधात ते तोंड उघडत नाहीत. मशिदींची विटंबना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाचा निषेध नाही. दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 20 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींकडून 3 पिस्तूल आणि 5 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. हिंसाचार भडकवण्यासाठी पिस्तूल आणि तलवारीचा वापर करण्यात आला. मात्र, हिंसाचाराच्या आणखी अनेक व्हिडिओंवरून आरोपींची ओळख पटवली जात आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)