Medical College Slab Collapsed: गुरजातच्या मोरबी येथील मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु झाले.  स्लॅब खाली अडकलेल्यांना बचावकार्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्लॅब कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असलेल्या मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळण्याची दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. हेही वाचा- उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारतीतून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)