Slab Collapsed in Ulhasnagar (Photo Credits: News18 Lokmat/Twitter)

जुन्या बांधकामामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे मुंबईत अनेक ठिकाणी इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या घटना कानावर ऐकायला येतात. न्यूज18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) कॅम्प क्रमांक 1 मध्ये असलेल्या मोहिनी इमारतीचा (Mohini Building) स्लॅब दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्बॅल कोसळून तो पहिल्या मजल्यावर आला आणि त्यामुळे येण्या-जाण्याचा रस्ताच बंद झाला. परिणामी इमारतीमधील रहिवासी इमारतीतच अडकले.

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरु असून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.हेदेखील वाचा- Thane: ठाण्यात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, दिव्याच्या खाडीत मृतदेह फेकणाऱ्या 2 जणांना अटक

Tweet:

Tweet:

अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने खिडकीतून एक-एक करुन नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. दुर्घटनेची माहिती मिळताच आसपासच्या परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळा येत होता अखेर पोलिसांनी या बघ्यांच्या गर्दीला पांगवण्यास सुरुवात केली.

याआधी मुंबईत इमारतीचे स्लॅब कोसळल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळाल्या. विशेषत: पावसाळा सुरु झाला की अशा अनेक घटना समोर येतात. त्यामुळे प्रशासनाने वेळीच अशा इमारतींचे ऑडिट करु योग्य त्या उपाययोजना कराव्या असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.