Thane: ठाण्यात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, दिव्याच्या खाडीत मृतदेह फेकणाऱ्या 2 जणांना अटक
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

ठाण्यातील (Thane) दिवा-शिळफाटा रोड (Diva- Shilphata) येथील खाडीमध्ये दोन दिवसांपूर्वी एका लाल रंगाच्या पेटीमध्ये कुजलेल्या अवस्थेत एका तरूणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. ही घटना 13 मे रोडी उघडकीस आली होती. याप्रकरणाचा छडा लावण्यात डायघर पोलिसांना (Daighar Police Station) अखरे यश आले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवा-शिळफाटा रोड लगत असलेल्या खर्डीगाव परिसरात 13 मे रोजी 2021 सायंकाळी 6.45 च्या सुमारास स्थानिकांना एका लोखंडी पत्र्याची पेटी आढळली होती. या पेटीतून दुर्गंध येत असल्याने त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. सदर घटनास्थळी मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहणी केली असता, सदर लोखंडी पत्र्याच्या पेटीमध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला होता. या घटनेची माहिती होताच मुंब्रा पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, रजत नायक (वय, 35) असे मृत तरूणाचे नाव असून तो ओरीसा येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली. हे देखील वाचा- धक्कादायक! अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना जाग्या झाल्या मृत आजी, बारामतीतील मुढाले घटना

या प्रकरणाचा सखोल तपास करत पोलिसांनी अखेर दोनच दिवसांत हत्येचा छडा लावला आहे. डायघर पोलिसांनी 2 जणांना अटक केले आहे. लैंगिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पत्रकार परिषद घेवून हत्या कशी आणि का करण्यात आली होती, याचा खुलासा करणार असे पोलिसांनी सांगितले आहे.

डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या पतीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला दादर रेल्वे स्थानकातून अटक केली होती. हत्येच्या वेळी आरोपीचा तीन वर्षीय मुलगाही घरातच होता. आईची हत्या झाल्यानंतर दोन तास हा मुलगा आईच्या प्रेताजवळ बसून रडत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांना हत्येची माहिती पोलिसांना दिली होती.