तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसणार नाही अशी एक धक्कादायक घटना बारामतीतील मुढाले गावात घडली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक कुटूंब कोलमडून गेले आहेत. अशात बारामतीत (Baramati) मुढाले (Mudhale) गावात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. कोविडने मृत्यू झालेल्या 76 वर्षीय आजीबाईंनी अंत्यसंस्कारांवेळी अचानक डोळे उघडले. हे दृश्य पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या आजींना 10 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना घरातच विलगीकरण करण्यात आले होते. मात्र 10 मे ला त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले. त्यांचे नातेवाईक त्यांना रुग्णालयात नेत असता अचानक त्या आजींनी प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे सर्वांनी त्या मृत झाल्या असे गृहित धरले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरु केली.हेदेखील वाचा- कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जालन्यात लहान मुलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
आजी गेल्याने घरातल्या महिलांनी हंबरडा फोडला आणि आजीने डोळे उघडले. त्यानंतर आश्चर्यचकीत झालेल्या नातेवाईकांनी तात्काळ आजीला रुग्णालयात दाखल केलं.
शकुंतला गायकवाड यांना बारामतीतील सिल्व्हर जुबली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुढाले गावात अशी घटना घडल्याचं पोलिसांनीही कबुली दिली आहे.
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका रुग्णालयातील तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात एक तरुणी ICU मध्ये कोरोनावर उपचार घेत असताना 'लव यू जिंदगी' (Love you Zindgi) हे गाणे ऐकत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटक-यांकडून तिच्या हिंमतीचे कौतुक केले जात होते. मात्र तिची कोरोनाशी झुंज अखेर गुरुवारी रात्री संपली. कोरोनाशी लढत असताना तिचा करुण अंत झाला आहे.
ज्या डॉक्टरांनी तिचा व्हिडिओ शेअर केला होता त्यांनीच तिच्या मृत्यूची माहिती दिली आहे. डॉ. मोनिका लांगेह यांनी कोरोना इर्मजन्सी वॉर्डमधून 30 वर्षाच्या या तरुणीचा व्हिडिओ शेअर केला होता. जी कोरोना संक्रमित असून कोरोनाशी झुंज देत होती.