ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे, तर 747 लोक जखमी झाले असून 56 जण गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे. बहनगा बाजार स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा स्टेशनवर थांबा नसल्याने ट्रेन पूर्ण वेगाने धावत होती. टक्कर इतकी जोरदार होती की त्यातील 21 डबे रुळावरून घसरले आणि 3 डबे दुसऱ्या मार्गावर पडले. यादरम्यान यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही तेथून जात होती, त्यामुळे तिचीही धडक झाली. हावडा एक्स्प्रेसचे मागील दोन डबेही रुळावरून घसरले. कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये सुमारे 1257 आरक्षित प्रवासी आणि यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये 1039 आरक्षित प्रवासी होते.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)