‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’चे चौथे पर्व येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’कडे पाहिले जात आहे. नुकताच, या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात Grand Premiere ला येणार लाखों दिलाची धडकन येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच अजून एका व्हिडीओत एक तरुणी बोल्ड डान्स करताना दिसत आहे. यात तिचा चेहरा दिसत नसला तरी तिच्या डान्सने आणि बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच तिचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)