मराठी सिनेमातील सशक्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आणि प्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी नुकतीच हिंदीतील लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली. आपल्या आगामी वेबशोच्या प्रोमोशनसाठी ही मंडळी कपिलच्या मंचावर आली होती. त्यांच्यासोबत अभिनेता रवीकिशनसुध्दा (Ravi Kishan) होता. तेव्हा सोनाली कुलकर्णीने कपिलची चांगलीच शाळा घेतली. सोनाली कुलकर्णीनं कपिलला मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलंच सुनावलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)