‘मिले जब हम तुम’ आणि ‘इस प्यार को क्या नाम दूं’ मालिकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री सनाया इराणी तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असते. अलीकडेच ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सनायाने तिच्या मुंबईतील महाविद्यालयीन दिवसातील एक दुःखदायक प्रसंग शेअर केला आहे. सनायाने सांगितले की, एका मैत्रिणीसोबत जात असताना चालत्या बसमध्ये एका व्यक्तीने तिच्यासमोर चक्क हस्तमैथुन केले.

हॉटरफ्लायसोबतच्या तिच्या संभाषणादरम्यान, सनायाने तिचा त्रासदायक अनुभव कथन केला. तिने सांगितले की, एकदा ती कॉलेजमधून घरी जात असताना बसमध्ये तिच्या गुडघ्याला एका व्यक्तीने स्पर्श केला. त्यानंतर ती व्यक्ती तिच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली आणि हस्तमैथुन करू लागली. नंतर तिच्या मैत्रिणीच्यासोबत ती पुढच्या स्टॉपवर उतरली. सनायाला आणखी एक अस्वस्थ करणारा प्रसंग आठवला. ती म्हणाली, 'एकदा बस स्टॉपवर एक माणूस माझ्याकडे बघत, हातवारे करत हस्तमैथुन करत होता. त्यानंतर तो मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिथून निघून गेले.' (हेही वाचा: The Bluff Film Shooting: अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनसने तिच्या आगामी चित्रपटाचे बीटीएस केले शेअर, रक्ताने माखलेला फोटो केला शेअर)

पहा संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)